You are currently viewing नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगावर जिल्हा समन्वयकपदी निवड

नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगावर जिल्हा समन्वयकपदी निवड

नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगावर जिल्हा समन्वयकपदी निवड

सावंतवाडी

सामाजिक भान जपणारे सावंतवाडीतील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगावर जिल्हा समन्वयक म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सावंतवाडी परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
उदयनराजे यांच्या विश्वासातील तसेच भाजप पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून नारायण सावंत यांची ओळख आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी समाजात वेगळी छाप निर्माण केली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गुरुकुल येथे पुष्पगुच्छ देऊन सावंत यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक आनंद नेवगी तसेच गुरुकुल व राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते बंड्या तोरस्कर, दिलीप पवार, अभय पंडित, मनोज घाटकर, उमेश खटावकर, शिवम सावंत, अशोक पेडणेकर, मयूर लाखे, इफ्तिकार राजगुरू, कादर गवंडी, धीरज गावडे व रवी जाधव उपस्थित होते.
सावंत यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील कामगार व किमान वेतनाशी संबंधित प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा