You are currently viewing वडाचापाट ग्रामपंचायतीकडून आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय साहित्य सुपूर्द

वडाचापाट ग्रामपंचायतीकडून आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय साहित्य सुपूर्द

वडाचापाट ग्रामपंचायतीकडून आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय साहित्य सुपूर्द

मालवण
वडाचापाट ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. रक्तदाबाच्या गोळ्या तसेच ग्लुकोमीटर स्ट्रिप्स यांसारखे आवश्यक वैद्यकीय साहित्य सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई व उपसरपंच सचिन पाताडे यांच्या हस्ते आरोग्य उपकेंद्र, माळगाव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, तसेच रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांना आवश्यक तपासणी आणि औषधोपचार वेळेत मिळावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविला.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्री. लक्ष्मण सरमळकर, श्री. दयानंद देसाई, श्री. प्रथमेश पालव, ग्रामस्थ कासले तसेच ग्रामपंचायत कर्मचारीवृंद उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या या आरोग्यविषयक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा