*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम बालगीत*
*मनात फुलते जाई* ( बालगीत )
————————-
घरामधे प्रेमभराची
बाग फुलवते आई
सायंकाळी बाबा दिसता
मनात फुलते जाई
आई नंतर पदरालागी
कोण दडवते बाई
ती तर असते माझ्या मागे
गोड गोजिरी ताई
भल्या सकाळी अंगणामध्ये
चिमण गाणी कोण गाई
घरा भोवती बागडणारे
ते तर आमुचें भाई
सायंकाळी गोष्टी सोबत
आजी ची अंगाई
पापा घेउन मजला म्हणते
” दुधा वरची तू साई ”
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
@सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
9130861304
