अमरावतीचे ऋण फेडण्यासाठी शिवजयंतीनिमित्त व्याख्याने देण्यासाठी अमरावतीला आलो आहे.
डॉ.प्रवीणकुमार शेंडे यांचे अमरावतीत आगमन
येत्या शिवजयंतीनिमित्त नागपूर आणि अमरावती विभागात वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याने देण्यासाठी मिशन आयएएस अमरावती या संस्थेने पुण्याचे सुप्रसिद्ध वक्ते व संमोहन तज्ञ डॉ. प्रवीण कुमार शेंडे यांना निमंत्रित केले आहे. आज अमरावती येथे त्यांचे शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी आगमन झाले .त्याप्रसंगी मिशन आयएएस व सार्वजनिक वाचनालय नांदगाव पेठतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रवीणकुमार शेंडे हे 28 फेब्रुवारी पर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शिवजयंती निमित्त मिशन आय ए एस ने आयोजित आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना नागरिकांना पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.
आज नांदगाव पेठ येथील सार्वजनिक वाचनालयमध्ये त्यांचा सत्कार झाला .त्याप्रसंगी त्यांनी मी अमरावतीचा सुपुत्र आहे .आज जरी मी वक्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलो तरी माझी पाळे मुळे ही अमरावतीची आहेत. त्यासाठी मी शिवजयंतीनिमित्त वीस दिवस व्याख्याने देण्यासाठी अमरावतीला आलो आहे. मातृऋण फेडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे असे उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. नांदगाव पेठ येथील सार्वजनिक वाचनालयात संपन्न झालेल्या या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिशन आय ए एस.चे संचालक प्रा. डॉ
नरेशचंद्र काठोळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माझी माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयप्रकाश खडसे हे होते. याप्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे सचिव श्री राजन देशमुख यांनी प्रास्ताविक केले. तर श्री राजन देशमुख यांनी शाल व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन डॉ.शेंडे यांचा सत्कार केला. डॉ प्रवीणकुमार शेंडे हे शिवजयंतीनिमित्त दहा ते 28 फेब्रुवारीपर्यंत अमरावती व नागपूर विभागात विविध ठिकाणी व्याख्याने देणार आहेत. मिशन आयएएसने या व्याख्यानाचे संपूर्ण आयोजन केले आहे .याप्रसंगी पत्रकार श्री दिनकर सुंदरकर डॉ. प्राप्तिका कापडे गोपाल देशपांडे हे विचार पिठावर उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानानंतर डॉ. प्रवीणकुमार शेंडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मेमरी टेक्निकचे काही प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाची सांगता मिशन आय ए एसचे जनसंपर्क अधिकारी श्री चंद्रशेखर आसोले यांच्या आभाराने झाली. या कार्यक्रमाला सार्वजनिक वाचनालयाचे सदस्य तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते
ज्यांना डॉ. प्रवीणकुमार शेंडे यांची व्याख्याने त्यांच्या संस्थेत आयोजित करावयाची आहेत त्यांनी अधिक माहितीसाठी व त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी मिशन आय ए एस.चे संचालक प्रा डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा. विशेष म्हणजे डॉ. प्रवीणकुमार शेंडे हे मानधन घेणार नसून शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी विना मानधन व्याख्याने देणार आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रकाशनार्थ
राजन देशमुख
सचिव
सार्वजनिक वाचनालय
नांदगाव पेठ जिल्हा अमरावती
