You are currently viewing तुझे माझे जुळताना

तुझे माझे जुळताना

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तुझे माझे जुळताना*

 

तुझे माझे जुळताना

मन पायरी झिजली

रंगरुपाची गणिते

नाही कधीच जुळली

 

रंगसंगती साधण्या

कैक चप्पल झिजले

चालणाऱ्या वाटेवरी

बंध सहज सुटले

 

कोल्हापूरी चप्पलेशी

नाते माझे बिनसले

चालता चालता तीने

घाव घर्षणाचे दिले

 

चुकून पडले असे

चपला लागल्या खास

पावले हसली माझी

घेते मी मोकळा श्‍वास

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा