संजू परबांचे अभिनंदन; मतदार, तरुण व महिलांचे मानले आभार
सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार
सावंतवाडी :
आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत सुदन कवठणकर यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विजयानंतर पत्रकारांशी बोलताना कवठणकर यांनी सर्वप्रथम संजू परब यांचे अभिनंदन केले. संजू परब यांनी माझ्यावर विश्वास दाखवून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, तो विश्वास आज निकालाच्या माध्यमातून खरा ठरवून दाखवला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या विजयाबाबत सविस्तर बोलताना कवठणकर म्हणाले की, या विजयाचे संपूर्ण श्रेय आरोंदा, सातार्डा, मडुरा, कवठण, तळवणे, तिरोडा आणि नानोस येथील युवा पिढीला जाते. या भागातील तरुणांनी मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. तसेच महिला भगिनींनी दाखवलेल्या उत्साही सहभागामुळेच हा विजय शक्य झाला, असेही त्यांनी नमूद केले.
माझ्या राजकीय अस्तित्वाला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचे काम येथील जनता आणि पत्रकार बांधवांनी केले आहे. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, असे कवठणकर यांनी सांगितले.
मतदारांनी माझ्या खांद्यावर सोपवलेली जबाबदारी मी शंभर टक्के पार पाडेन. आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहीन, असा विश्वास नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी व्यक्त केला.
