You are currently viewing मुणगे मतदारसंघात भाजपचे सदाशिव ओगळे विजयी
Oplus_16908288

मुणगे मतदारसंघात भाजपचे सदाशिव ओगळे विजयी

देवगड :

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतील मुणगे (सर्वसाधारण) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सदाशिव पुरुषोत्तम ओगळे यांनी विजय संपादन केला आहे. त्यांनी शिवसेना (उबाठा)चे उमेदवार दीपक नारायण कदम यांचा पराभव केला.

निवडणूक निकाल जाहीर होताच मुणगे परिसरात भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

या विजयानंतर सदाशिव ओगळे यांनी मतदारांचा विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीमुळेच हा विजय शक्य झाल्याचे सांगितले. तसेच मतदारसंघातील पायाभूत सुविधा, स्थानिक विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा