जि.प.मध्ये भाजपचे संदीप गावडे विजयी, पं.स.मध्ये शिवसेनेच्या सुस्मिता जाधव सरशी; मळगाव गटातून भाजपचे गौरव मुळीकही विजयी
सावंतवाडी / तळवडे :
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे युवा नेते तथा रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक संदीप गावडे यांनी विजय मिळवला असून ठाकरे शिवसेनेचे रुपेश राऊळ यांचा पराभव झाला आहे.
दरम्यान, पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेच्या सुस्मिता जाधव यांनी विजय मिळवत भविष्यात सभापतीपदावर दावा मजबूत केला आहे. तसेच मळगाव गटातून भाजपचे गौरव मुळीक हेही विजयी झाले आहेत.
