वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत युवक-युवतींची दमदार कामगिरी
वेंगुर्ला
मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग अंतर्गत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि जिमखाना विभाग, कनिष्ठ महाविद्यालय बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने आयोजित वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रा. विरेंद्र देसाई, वेताळ प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सचिन परुळकर, डॉ. बी. जी. गायकवाड, प्रा. आर. डी. सूर्यवंशी, डॉ. जी. पी. धुरी, प्रा. गिरी, प्रा. हेमंत गावडे, प्रा. वासुदेव गावडे, सर्पमित्र महेश राऊळ, किरण राऊळ, प्रज्वल परुळकर, रोहित गडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धांमध्ये तालुक्यातील युवक-युवतींनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत क्रीडाप्रेमींना रंगतदार अनुभव दिला. या स्पर्धांतील वेंगुर्ला तालुक्यातील सर्व विजेते खेळाडू व संघ आता सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरले आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी म्हणाले की, “क्रीडा हे केवळ शारीरिक बळ वाढवण्याचे माध्यम नसून शिस्त, संयम, नेतृत्वगुण आणि संघभावना घडविण्याचे प्रभावी साधन आहे. अशा स्पर्धांमुळे युवक-युवतींमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि निरोगी समाजनिर्मितीस हातभार लागतो.” त्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कबड्डी स्पर्धा (युवक गट)
प्रथम – जय मानसिश्वर संघ, वेंगुर्ला
द्वितीय – सेवन स्टार संघ, वेंगुर्ला
खो-खो स्पर्धा (युवती गट)
प्रथम – बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, कनिष्ठ विभाग
द्वितीय – जय गणेश वेंगुर्ले
गोळा फेक (युवक गट)
प्रथम – मिलरॉय मिंगेल फर्नांडिस
द्वितीय – ओंकार सिताराम साटेलकर
तृतीय – फ्लेविन नेपोलियन रॉड्रिक्स
गोळा फेक (युवती गट)
प्रथम – भक्ती ज्ञानेश्वर मेस्त्री
द्वितीय – सानिका अमोल वरसकर
तृतीय – खुशी धनंजय गिरप
१०० मीटर धावणे (युवक गट)
प्रथम – ओम नरेश गावडे
द्वितीय – साहिल ज्ञानदेव सावंत
तृतीय – कुसाजी नवनाथ शिरफुटे
१०० मीटर धावणे (युवती गट)
प्रथम – खुशी धनंजय गिरप
द्वितीय – चैताली विश्वास पवार
तृतीय – चंदना विठ्ठल कुंभार
कबड्डी स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके
उत्कृष्ट चढाई – साहिल उदय गोहर
उत्कृष्ट पकड – ओम नरेश गावडे
अष्टपैलू खेळाडू – पार्थ विनयकुमार सातार्डेकर
स्पर्धांमध्ये पंच म्हणून प्रा. हेमंत गावडे व प्रा. वासुदेव गावडे यांनी काम पाहिले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले.
या क्रीडा स्पर्धांमुळे युवक-युवतींमध्ये क्रीडावृत्ती, शिस्त, संघभावना आणि आरोग्याविषयीची जाणीव अधिक बळकट झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
