*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अलौकिक हा खेळ असे हो…*
मनभावन हा सुटतो वारा उडवी पर्णपिसारा
अलौकिक हा खेळ असे हो भगवंताचा न्यारा..
जीवनदायी हवा येथली पाण्या चव ती न्यारी
झोपडीतली गरमागरम ती असे भाकरी प्यारी
महालात ना सुख हो येथे सुखद असा हा पसारा
अलौकिक हा खेळ असे हो…
गरीब नांदती सुखात येथे नसते उद्याची चिंता
आज मिळाले काम हाताला उद्या पाही भगवंता
कुठे मी लपवू धन हे काळे श्रीमंत तो “ बिचारा”
अलौकिक तो खेळ असे हो..
माती पाणी वायू मुबलक नको खर्चाया धन
हिरवे हिरवे कोंभ कोवळे प्रसन्न होतसे मन
माळावरती उघड्यावरती उघडे मोरपिसारा
अलौकिक तो खेळ असे हो..
नभ निळे हे त्याची निळाई अनंत हे अवकाश
रात्री सुधांशु दिवसा देतो नारायण तो प्रकाश
नक्षत्रे नि खड्या चांदण्या काळोखात नजारा
अलौकिक तो खेळ असे हो..
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
