सावंतवाडी तालुक्यातील जनतेचा भक्कम पाठिंबा माझ्या पाठीशी – प्रचारादरम्यान पत्रकारांशी संवाद
सावंतवाडी :
मतदारांना कितीही आमिषे दाखवली, ऑफर्स दिल्या तरी माझा विजय निश्चित आहे. येथील जनता विकली जाणारी नाही. ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा ठाम विश्वास उमेदवार रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला.
प्रचार फेरीदरम्यान पत्रकारांशी बोलताना राऊळ म्हणाले की, माझ्यासारखा कार्यकर्ता या मतदारसंघातून निवडून आला, तर पालकमंत्र्यांनाही या मतदारसंघासाठी विकासनिधी देण्यास भाग पाडू. विकासासाठी मी कुठेही तडजोड करणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका करताना सांगितले की, “प्रमोद गावडे यांच्या अश्रूंची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार आहे. या मतदारसंघात इथली जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
