श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा उत्साहात संपन्न…
सावंतवाडी
महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धांस्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व 365 खेड्यांचा अधीपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यानिमित्ताने शेकडो भाविक देव उपरलकर चरणी नतमस्तक होत आहेत.
