You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात महायुतीचा जोरदार प्रचार; बंडखोरांना जागा दाखवणार – गणेशप्रसाद गवस

दोडामार्ग तालुक्यात महायुतीचा जोरदार प्रचार; बंडखोरांना जागा दाखवणार – गणेशप्रसाद गवस

दोडामार्ग तालुक्यात महायुतीचा जोरदार प्रचार; बंडखोरांना जागा दाखवणार – गणेशप्रसाद गवस

दोडामार्ग

दोडामार्ग तालुका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केर ग्रामपंचायत भागात महायुतीच्या वतीने जोरदार प्रचार करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गोवा संपर्क प्रमुख सुभाष सावंत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या प्रचार सभेला राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, राज्य सचिव काशिनाथ मयेकर, कोनाळ जिल्हा परिषद उमेदवार सौ. सायली स्वप्नील निंबाळकर, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गंवस, कोनाळ सरपंचपती अनिल गंवस, घोडगेवाडी सरपंच सागर कर्पे, श्रीनिवास शेटकर, तुकाराम देसाई (माजी पोलीस पाटील), बापू देसाई तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुतीच्या वतीने भाजपाकडून सौ. सायली निंबाळकर या निवडणूक लढवत असून या भागात शिवसेनेचे कार्यकर्ते मनापासून काम करत आहेत. प्रचाराला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून दोडामार्ग तालुक्यातील महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महायुती गठबंधन असतानाही भाजपाचे काही पदाधिकारी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्याबद्दल तालुका अध्यक्ष गणेशप्रसाद गंवस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “अशा बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ. त्यांच्या भुलथापांना मतदार बळी पडणार नाहीत. आमचे निष्ठावंत कार्यकर्ते हाच आमचा खरा विजय आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा