You are currently viewing ठाकरे शिवसेनेच्या आंबोली उप विभाग प्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

ठाकरे शिवसेनेच्या आंबोली उप विभाग प्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

ठाकरे शिवसेनेच्या आंबोली उप विभाग प्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

सावंतवाडी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून आंबोली जिल्हापरिषद गटात ठाकरे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे शिवसेनेचे उप विभाग प्रमुख बुधाजी पाताडे यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी आज जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्ष निरीक्षक राजेश मोरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री.परब व श्री. मोरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

या पक्षप्रवेशामध्ये ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर, निधी गुरव, राजा गुरव यांच्यासह रामचंद्र आमडोस्कर, निखिल गुरव, जीजी राऊत, गोविंद जाधव, संजय राउत, सुनील राऊत, शोभना राऊत, रिया पाताडे, संजय पडते, बाबुराव शेळके, लक्ष्मण जाधव, कांता गुरव, अनिल मेस्त्री आणि केशव जाधव या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांनी महायुतीच्या कार्यपद्धतीवर विश्वास दर्शवत पक्ष निरीक्षक राजेश मोरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले.

यावेळी तालुकाप्रमुख दिनेश गावडे, पंचायत समितीचे उमेदवार मायकल डिसोजा, विभाग प्रमुख विलास गावडे, माजी सरपंच जगन्नाथ गावडे, अरुण गावडे, नंदू गावडे, विशाल बांदेकर, उत्तम नार्वेकर यांसह पक्षाचे इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा