मुक्ताईनगर / (बबनराव आराख) :
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे जगातील पहिली महिला सर्प रक्षक तथा नारीशक्ती – राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हिवरा आश्रम जिल्हा बुलढाणा येथील वनिता बोराडे यांचे पर्यावरण व सर्प या विषयावर कला,वाणिज्य महाविद्यालय कुऱ्हा काकोडा श्री शिवाजी हायस्कूल वडोदा तथा नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध जातीच्या सापां विषयी त्यांचे सखोल माहिती दिली. यावेळी त्यांचे पती डी.भास्करराव बोराडे हे देखील उपस्थित असून त्यांनी सुध्दा त्यांच्या शैलीत सापाच्या विविध जाती विषयी महत्त्वाची माहिती दिली. याप्रसंगी त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रामध्ये सापांच्या एकूण ५२ जाती असून त्यापैकी ४० जाती ह्या बिनविषारी आहेत आणि १२ जाती विषारी आहेत त्यातील ८ जाती घनदाट अरण्यामध्ये असतात तर ४ जाती या गावात, नजीकच्या नदी, तलाव, शेती मध्ये असतात साप चावला असता काय करावे त्यावर कुठला उपाय करावा याविषयी सुद्धा त्यांनी विस्तृत माहिती दिली. साप कुणाच्याही मागे धावत नाही किंवा तो स्वतःहून चावत नाही साप हा घाबरट प्राणी आहे तसेच साप दूध पीत नाही याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना अध्यात्मिक, प्राचीन व आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी कला वाणिज्य महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोद शिवलकर उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र फडके सौ.गौरी फडके सचिव श्री बी.डी.कुलकर्णी सदस्य श्री निवृत्तीभाऊ पाटील श्री सुनील चौधरी व प्राचार्य डॉ.पी.व्ही. पिंगळे प्रा.सचिन जोशी प्रा.मनोज वाघ श्री पी.एम. घोगरे तथा श्री शिवाजी हायस्कूल वडोदा येथे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर वनारे शिक्षक श्री एस.आर. मराठी श्री संतोष उगले श्री अनंत तायडे त्याचप्रमाणे नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे मुख्याध्यापक डॉ.शिवचरण उज्जैनकर शिक्षक श्री संतोष ठाकूर श्री संतोष पाचपोळ श्री रोहन आठवले शिक्षकेतर श्री रघुनाथ इंगळे श्री विनायक इंगळे, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध विद्यालयात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विविध विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी सर्पमित्र तथा सर्प रक्षक वनिता ताई बोराडे व त्यांचे पती डी. भास्करराव यांना विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे अभ्यासपूर्ण उत्तर दिलीत हा उपक्रम नवीन माध्यमिक विद्यालय ,पारंबीचे मुख्याध्यापक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी आयोजित केला होता. याप्रसंगी प्रत्येक विद्यालयामध्ये वनिता ताई बोराडे व डी.भास्करराव तसेच डॉ.शिवचरण उज्जैनकर यांचा शाल व गुलाब बुके देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
