You are currently viewing राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 स्टेशन हेडक्वार्टस, कोल्हापूर येथून प्राप्त माहितीनुसार रक्षा मंत्रालय यांच्यामार्फत सेवारत सैनिक, माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम तीन क्रमांकात येणाऱ्या पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती लागु राहील. त्यासाठी अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

अधिक माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांचा दुरध्वनी क्र. 02363 228820 किंवा मोबा. 8219285788,7028318407  या क्रमांवार संपर्क साधावा.

राष्ट्रीय

सुवर्ण पदक : – 1,00,000 रुपये, रजत पदक:- 80,000 रुपये, कांस्य पदक :-60,000 रुपये,

सहभाग :- 30,000 रुपये

आंतरराष्ट्रीय

सुवर्ण पदक :-2,00,000 रुपये, रजत पदक :-1,50,000 रुपये, कांस्य पदक :-1,00,000 रुपये

सहभाग:-50,000 रुपये

प्रतिक्रिया व्यक्त करा