You are currently viewing वैभववाडी तालुक्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात धनगर समाज असून या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकही धनगर समाजाचा उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाकडून दिलेला नाही

वैभववाडी तालुक्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात धनगर समाज असून या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकही धनगर समाजाचा उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाकडून दिलेला नाही

*वैभववाडी तालुक्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात धनगर समाज असून या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकही धनगर समाजाचा उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाकडून दिलेला नाही*

*विशेष करून सत्ताधारी पक्षाला धनगर समाजाची मते पाहिजेत पण धनगर समाजाचा नेतृत्व मान्य नाही ही शोकांतिका*

*धनगर समाज युवा कार्यकर्ते विकास अडुळकर यांचा घणाघात*

*वैभववाडी*
वैभववाडी तालुक्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने एक धनगर समाज युवा कार्यकर्ते विकास अडुळकर यांचा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक पार्श्वभूमीवर सत्ताधारी व इतर राजकीय पक्षाला सवाल.
अडुळकर यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकात असे म्हटले आहे की,वैभववाडी तालुक्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात धनगर समाज असून चालू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकही धनगर समाजाचा उमेदवार सत्ताधारी व इतर कोणत्याही राजकीय पक्षाकडून दिलेला नाही ही कमालीची बाब आहे. विशेष करून सत्ताधारी पक्षाला ज्यांना गेल्या सर्व निवडणुकीत धनगर समाजाने मोठ्या प्रमाणात भरभरून प्रतिसाद दिला व मतदान केले त्यांना देखील आमच्या धनगर समाजाच्या एकाही व्यक्तीला उमेदवारी देण्याचे योग्य वाटले नाही. हे सर्व पाहता असे लक्षात येते की या सर्व राजकीय पक्षांना धनगर समाजाची मते पाहिजेत पण धनगर समाजाचा नेतृत्व मान्य नाही.वापरा आणि फेका असेच म्हणावे अशी गत आहे.
आमचा धनगर समाज हा पूर्वीपासून साधा भोळा व इमानदारीने साथ देणार आहे पण याचा अर्थ असा नाही की आमच्या समाजाचा प्रत्येक वेळी फक्त मतदानासाठी वापर केला जाईल.गेल्या काही दशकापासून आपल्या समाजाने स्वतःची प्रगती हळूहळू का होईना पण बऱ्यापैकी केली आहे. पण तरीसुद्धा आजही वैभववाडी तालुक्यामध्ये बऱ्याच अश्या वाड्या, वस्त्या आहेत जिथे आजही मूलभूत गरजांची गैरसोय आहे त्या म्हणजे (रस्ता,पाणी आणि वीज.)
जर तालुक्यातील आपल्या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत ह्या मूलभूत सुविधा द्यायच्या असतील तर आमच्या समाजाचा नेतृत्व उभा राहणे गरजेचे होत. व या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी व इतर पक्षाकडून उमेदवारी मिळाली असती तर नक्की आमचे नेतृत्व उभे राहिले असते पण स्थानिक पुढाऱ्यांना ते मान्य नसावे म्हणून उमेदवारी मागून ही डावलली गेली असावी. परंतु यावेळी सर्व तालुक्यातील समाज बांधव समाजाचे कार्यकर्ते, नेते सर्व राजकीय पक्षातील समाज नेते यांनी आता सर्वांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवण्याची आपल्याच तालुक्यात जर आपल्या समाजाचा महत्त्व आपण टिकवू शकलो नाही तर इथून पुढची वाटचाल ही आपल्यासाठी कठीण असेल त्यामुळे मी या प्रसिद्धपत्रकाच्या मार्फत सर्व समाज बांधवांना विनंती करीन की एका स्वतंत्र झेंड्याखाली एकत्र या सर्व समाज बांधवांना एकत्र करा एकजूट व्हा आम्हाला डावलणाऱ्याचा सुखडा साफ करा.
असे देखील नाही की आपल्या समाजात नेतृत्वाचा अभाव आहे आजही वैभववाडी तालुक्यामध्ये आपल्या समाजाचे अनेक असे कार्यकर्ते आहेत व युवा नेतृत्व आहेत जे गेले अनेक वर्ष तालुक्यामध्ये विविध सामाजिक क्षेत्रातून राजकीय पक्षातून समाजकार्यात सक्रिय आहेत तरीसुद्धा त्यांना जर संधी मिळत नसेल तर इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत धनगर समाजाचा एक उमेदवार हा निवडणुकीच्या रिंगणात असलाच पाहिजे अशी आग्रहाची मागणी करा मगच निवडणुकीला सामोरे जा.मग तो उमेदवार कोणत्याही पक्षाकडून असे ना.
वैभववाडी तालुक्यामध्ये जर धनगर समाजाचा विकास करायचा असेल तर समाजाच्या हितासाठी समाजच नेतृत्व उभा केलच पाहिजे त्यासाठी आता मात्र आपापसातले मतभेद बाजूला सारून धनगर समाजाचा एक भक्कम नेतृत्व वैभववाडी तालुक्यामध्ये उभा करून सर्वांनी एका मताने एकत्र येणे काळाची गरज आहे.या सर्व महत्त्वाच्या गोष्टी स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व पक्षाचे नेते यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यांच्याकडे या गोष्टी स्थानिक नेते पोहचवत नाही जर या गोष्टी पोहचल्या तर नक्कीच वरिष्ठ नेते आपल्याला न्याय देतील असा विश्वास देखील विकास अडुळकर यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा