*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्री अरुणजी वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
_______________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- १३४ वे
अध्याय- २१ वा , कविता – ८ वी
___________________________
सतराव्या अध्यायात । कथा विष्णुसाची यात । नेई स्वामींना भास्कर आगगाडीत । मलकापुरास ।। १।।
स्वामी असती ध्यानमग्न । त्यात रहाती नग्न । ठरले हेच विघ्न । या प्रवासात ।।२।
पोलिसांनी स्वामींवर खटला भरला । त्रास दिला सत्पुरुषाला। विचार नाही केला । या समयाला ।।३।।
साहेबांनी दंड ठोठवला । नाही व्यवस्थित ठेवले स्वामीला । कर्तव्यात भास्कर चुकला । असा निकाल दिला कोर्टाने । ४। ।
मेहताबशा शहाला । स्वामी भेटे अकोल्याला । उपदेश त्यास केला । पाठविले त्यास पंजाबला ।।५। ।
नरसिंगजीच्या भेटीला । स्वामी आले अकोटाला । विहिरीत
गंगा-भागीरथी आल्या । स्वामींना स्नान घालण्याला ।।६। ।
कवर डॉक्टराला ।फोडाचा असह्य त्रास झाला । तीर्थ देऊन भक्त बरा केला । कृपाळू स्वामींनी ।।७।। कथा या अठराव्या अध्यातल्या असे..
येता स्वामींनी पंढरीला । हरी दर्शन घडविले बापुना काळ्याला । उपदेश केला भक्तांना ।।८।।
मरीने झाला आजारी । कवठे बहादूरचा वारकरी । व्याधी त्याची झाली बरी । स्वामींच्या कृपेने ।।९।।
कर्मठ ब्राह्मणाचा अभिमान । केले त्याचे हरण । दाखविला
उठवून मृत श्वान । मठामाजी ।।१०।।
__________________________
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे – पुणे.
____________________________
