*प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांचा मेळावा
सिंधुदुर्ग
भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता कसाल सिद्धिविनायक मंदिर येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा व हळदी कुंकू सभारंभ पार पडला.या मेळाव्यामध्ये जिल्हा संयोजक मा.श्री.अनिल शिंगाडे सर, कोश अध्यक्ष श्री. सुनील तांबे सर, सहसंयोजक श्री.शामसुंदर लोट सर,5टक्के प्रभारी श्री. विजय कदम सर,क्रीडा प्रभारी सौ.जयश्री मेजारे मॅडम,कुडाळ तालुकाध्यक्ष सौ.आशा धुरी मॅडम श्री.बोभाटे सर, परब सर तसेच कर्मचारी दळवी मॅडम, विशाखा कासले मॅडम,अभय शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने लुई ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मान्यवरांच्या वतीने स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर जिल्हा संयोजक श्री अनिल शिंगाडे सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित दिव्यांग बांधवांचे संगीत खुर्ची ही स्पर्धा घेण्यात आली.त्यामध्ये 1 ते 3 नंबर काढण्यात आले.प्रथम क्रमांक नीलेश लाड, द्वितीय क्रमांक सारीका मोरये,तृतीय क्रमांक गौरेश बांदेकर या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले.त्यानंतर हळदी कुंकू सभारंभ पार पाडण्यात आले. हळदी कुंकू सभारंभ झाल्यानंतर बक्षीस वितरण सभारंभ करण्यात आले.आणि विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.
