You are currently viewing विद्योदय मुक्तांगण परिवार संस्थेच्यावतीने स्वयंसेवकांचा सत्कार

विद्योदय मुक्तांगण परिवार संस्थेच्यावतीने स्वयंसेवकांचा सत्कार

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

घोसरवाड (ता.शिरोळ) येथे विद्योदय मुक्तांगण परिवार संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या इमारतीच्या बांधकामाचा भुमिपूजन व स्वयंसेवकांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या देणे समाजाचे संस्थेच्या श्रीमती वीणाताई गोखले, अल्फा इंटरप्रायझेसचे कृष्णा गोडबोले, उचल फौंडेशनचे सचिन खेडेकर, फिनिक्स कंपनीचे सचिन कुलकर्णी, घोसरवाडचे सरपंच साहेबराव साबळे, उद्योजक संजय माळी, जेष्ठ समाजसेवक विनायक गद्रे सौ.विनया गद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्योदय मुक्तांगण परिवार संस्थेच्या माध्यमातून अब्दुललाट व ग्रामीण परिसरात शैक्षणिक, सामाजिक कार्य करण्यात येत आहे.विशेषत: ऊसतोड मजुर, वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षण देणे, ग्रामीण महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देणे व इतर विविध उपक्रम राबवून त्यांना स्वावलंबी करत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. या संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त नुकताच घोसरवाड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विदयोदय मुक्तांगण परिवार संस्थेच्या नियोजित इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर अब्दुललाट येथे संस्थेच्या दहावा वर्धापन दिन समारंभास उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

तसेच संस्थेसाठी विशेष योगदान देणाऱ्या स्वयंसेविका विज्ञानमित्र अमिता लोहार, शिक्षण मित्र निलम खोत, प्रियंका बंडगर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पाच हजार रुपये देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विदयोदय मुक्तांगण परिवार, सेवांकुर या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक , सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत हा प्रामाणिक सेवाभाव सर्वांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास विविध मान्यवर, संस्थेच्या सौ.सार्शा माळी, सौ.वर्षा पाटील, सौ.सुप्रिया ठिकणे राजैंद चौगुले, बाबासाहेब नदाफ , डॉ.सुधीर कुंभार इतर यांच्यासह स्वयंसेविका विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विनायक माळी यांनी तर सूत्रसंचालन बुध्दम मोहिते यांनी केले. ‌सपना उडाले यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा