You are currently viewing कुपवडे परिसरात बिबट्याचे दर्शन

कुपवडे परिसरात बिबट्याचे दर्शन

कुपवडे परिसरात बिबट्याचे दर्शन;

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कणकवली

कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील परिसरात शनिवारी (दि. २४ जानेवारी) रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावालगतच्या रस्त्यावर अचानक बिबट्या दिसल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून, बिबट्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. परिसरात नियमित गस्त वाढवावी, तसेच आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
वनविभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी व नागरिकांनीही रात्रीच्या वेळी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा