You are currently viewing महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तर्फे वासंतिक उत्सव साजरा

महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तर्फे वासंतिक उत्सव साजरा

पुणे:

दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी दरवर्षी प्रमाणे अक्षरवेल सभागृह पुणे येथे महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे संस्थेतर्फे सरस्वती पूजन सोहळा तसेच वसंतोत्सवा निमित्त गझलकार, लेखक मा. प्राचार्य लक्ष्मणराव शिवणेकर (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रसिद्ध ज्येष्ठ कवी, गझलकार मा. म.भा. चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे (महाराष्ट्र) संस्थेतर्फे भव्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या काव्यसंमेलनाच्या पूर्वार्धात पुण्यातील काव्यशिल्प या बुजुर्ग संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मा. कवयत्री व गझलकार सौ. राजश्री सोले तसेच सचिव कविवर्य, गझलकार मा. मकरंद घाणेकर यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भावकवी मा. वि.ग.सातपुते (आप्पा) यांनी प्रास्ताविकात संस्थेचे मुळ उद्दिष्ट भावी संकल्पना विषद केल्या तर उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. ठाकूरदास यांनी भारतीय साहित्य, कला, संस्कृती याबद्दल आपले विचार व्यक्त केले.

त्यानंतर मान्यवरांचा संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

त्यामध्ये डॉ. लक्ष्मण शिवणेकर आणि माननीय म.भा. चव्हाण तसेच विगसा यांनी आपल्या अमोघ शब्दांनी सभागृह मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात सुमारे ६० कवींनी आपल्या प्रासादिक रचना सादर केल्या.

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. महेंद्र ठाकूरदास, ॲड. संध्या गोळे, सचिव ऋचा कर्वे, उपसचिव राधिका दाते, कोषाध्यक्ष मकरंद घाणेकर तसेच ज्येष्ठ कवी, लेखक यशवंत देव तसेच अन्य मान्यवर उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा