You are currently viewing श्री साईबाबा संस्थानला टाटा सिएराची देणगी

श्री साईबाबा संस्थानला टाटा सिएराची देणगी

*श्री साईबाबा संस्थानला टाटा सिएराची देणगी*

छत्रपती संभाजीनगर :

टाटा मोटर्सच्या पुणे विभागातील सर्व डीलर्सच्यावतीने टाटा मोटर्सची *पहिली सिएरा ही कार शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानला देणगी म्हणून अर्पण करण्यात आली.*
टाटा सिएरा ही नवीन कार बाजारात दाखल झाली असून त्याचे बुकिंगही तडाख्यात झाले आहे. या कारचे वितरण सुरू होण्याआधी पहिली चारचाकी आज श्री साईबाबा संस्थानकरिता देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आली. या वाहनाची विधिवत पूजा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व टाटा मोटर्सचे डीलर्स यांच्या हस्ते केली. वाहनाची चावी अधिकृतरीत्या संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली. यानंतर श्री साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी टाटा मोटर्स, पुणे रिजनच्या सर्व डीलर्सचा सत्कार केला.
या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना टाटा मोटर्स चे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृत विक्रेते एस.पी.ॲाटोहब चे श्री अरुण देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शिर्डी संस्थान येथे टाटा मोटर्सच्यावतीने प्रथमच लाँच होणारी टाटा सिएरा ही कार भेट म्हणून प्रदान करण्यात आली, याचा आम्हाला मनापासून आनंद आणि अभिमान आहे. टाटा समूहासारख्या मूल्याधिष्ठित व सामाजिक जाणिवेने कार्य करणाऱ्या संस्थेशी आम्ही जोडले गेलो आहोत, ही बाब आमच्यासाठी गौरवास्पद आहे.
अधिक माहितीसाठी आपण आमच्या रत्नागिरी चिपळूण कणकवली किंवा ओरोस येथील शोरुम ला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

लाईक फॅालो शेअर
*https://www.instagram.com/p/DT5JRlFgvHR/*

प्रतिक्रिया व्यक्त करा