You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात युवा सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात युवा सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात युवा सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा ३४ वा वार्षिक युवा सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवार दि.२३ रोजी
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. सदानंद रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री. शैलेंद्र रावराणे, सहसचिव श्री. सत्यवान रावराणे, कोषाध्यक्ष श्री. अर्जुन रावराणे, स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे उपस्थित होते.
या प्रसंगी वार्षिक हेमंत क्रीडा महोत्सवामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये आजीवन अध्ययन विस्तार विभागाचा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार वैष्णवी विरेश रेवडेकर (तृतीय वर्ष विज्ञान), करिअर कट्टाचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार साहिल संतोष नर (द्वितीय वर्ष विज्ञान), राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उत्कृष्ट स्वयंसेवक (विद्यार्थिनी) पूजारी संपदा यशवंत (प्रथम वर्ष वाणिज्य) व उत्कृष्ट स्वयंसेवक (विद्यार्थी) दुर्वास रोहन सावंत (द्वितीय वर्ष वाणिज्य), राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत उत्कृष्ट स्वयंसेवक (विद्यार्थिनी) प्रेरणा संजय तावडे (तृतीय वर्ष विज्ञान) व उत्कृष्ट स्वयंसेवक (विद्यार्थी) मोहित दिनेश पार्टे (तृतीय वर्ष वाणिज्य), उत्कृष्ट सांस्कृतिक विद्यार्थी पूजा विलास तांबे (तृतीय वर्ष विज्ञान), आदर्श वाचक (विद्यार्थिनी) वैधयी प्रविण रावराणे (तृतीय वर्ष वाणिज्य) व आदर्श वाचक (विद्यार्थी) विनय प्रमोद सावंत (तृतीय वर्ष विज्ञान), आदर्श विद्यार्थिनी दिव्या अनंत गुरव (तृतीय वर्ष विज्ञान) तसेच आदर्श विद्यार्थी अनिकेत संतोष कुलकर्णी (तृतीय वर्ष वाणिज्य) यांचा समावेश होता, तर उत्कृष्ट खेळाडू (मुली) प्रगती राजेंद्र तावडे हिने, तर मुलांमध्ये आदित्य प्रमोद पवार याने प्रथम क्रमांक मिळविला. याप्रसंगी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आर. ए. भोसले यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच हर्ष संजय नकाशे याने विद्यापीठस्तरावर विविध पारितोषिके प्राप्त केल्याबद्दल त्याचाही विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव श्री. शैलेंद्र रावराणे, सहसचिव श्री. सत्यवान रावराणे, कोषाध्यक्ष श्री. अर्जुन रावराणे, स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन प्र.प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी यांनी केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार, अधीक्षक श्री. संजय रावराणे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. एस. बी. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आर. ए. भोसले व सर्व सदस्य यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षके-तर कर्मचारी, माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन. ए. कारेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा