कुडाळ येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी
कुडाळ
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ येथील शिवसेना कार्यालयात भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास संजय पडते, काका कुडाळकर, विनायक राणे, दीपक नारकर, देवेंद्र नाईक, अरविंद करलकर, संजय भोगटे, रोहित भोगटे, चंद्रकांत वालावलकर, सागर वालावलकर, श्री. तुळसकर, प्रसन्ना गंगावणे, राजवीर पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे अमर रहें, जय भवानी जय शिवाजी, जय महाराष्ट्र अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
