फोंडाघाट जि.प. मतदारसंघ शिंदे शिवसेनेकडे झुकणार?
कणकवली :
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवार बबन उर्फ मामा हळदीवे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हळदीवे यांनी शिंदे शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाची उमेदवारी शिंदे शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हळदीवे यांच्या प्रवेशामुळे मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी निवडणुकीत महायुतीला बळ मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, महेश कांदळगावकर, शरद वायंगणकर, सत्यवान राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून फोंडाघाट मतदारसंघात राजकीय चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
