*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*एआय च्या जाळ्यात अडकला कवी*
ए आयच्या सोनेरी पिंजऱ्यात
आजचा कवी सहज अडकला
झाला निष्प्राण त्याचा आत्मा
ए आयच्या गळात मासा फसला
विसरला कवी प्रतिभाशक्ती
अडकला ए आय च्या जाळ्यात
संपले वैभव कल्पनाशक्तीचे
गती झाली तळ्यात की मळ्यात
विज्ञानाने केली प्रगती
दिशा मिळाली जीवनाला
जाऊ नये फार आहारी
परावलंबी व्हायचे कशाला
सुंदर जीवन दिले देवाने
उपयोग त्याचा घ्यावा करून
स्वावलंबी असावे प्रत्येकाने
कसे चालेल स्व ला विसरून?
प्रतिभा पिटके
अमरावती
