You are currently viewing बहावा बहार

बहावा बहार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”बहावा बहार”*

आयुष्यात सर्व गोष्टींचा मोदे करावा स्वीकार
नशिबाने समोर आलेले सोसावे बिनतक्रार।।धृ।।

जीवन असे कष्टप्रद तरी धीर गंभीर
अशांती अतृप्तता धावणे तिथे अ-स्विकार
सचेतना ऋजुता शिकवे बहावा बहार।।१।।

उन्हाळा शिवरूप पावसाळा ब्रम्ह रहाणार
हिवाळा विष्णू उत्पत्ती स्थिती लय येणार
निसर्ग आहे,एक संपल्यावर नवे बनणार।।२।।

नि:शब्द नि:स्तब्ध,रुक्षता सोसतो प्रदूषण
जगणार उन्मुक्त दुर्दम्य पणे स्थितप्रज्ञ
बहावा प्रतिकूल परिस्थितीत बहरणार।।३।।

बहावा शिकवे संपूर्ण निवडरहित स्वीकार
बहाव्याचे फुलासम विसरावा अहंकार
उष्णतेचा रंग लेवून मन प्रसन्न करणार।।४।।

पितांबर नेसुनी सुदर्शन विराजमान
उभा राहे थाटात सुवर्णालंकार लेऊन
रखरखत्या उन्हांत देई आल्हाद अलवार।।5।।

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 15 =