You are currently viewing मी जीवनास नेहमीच..
Oplus_16908288

मी जीवनास नेहमीच..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मी जीवनास नेहमीच..*

 

मी जीवनास नेहमीच “वर” मानले

येईल सामोरे ते सारे कवेत घेतले..

.मी जीवनास नेहमीच …

 

सुख आले पाठोपाठ मग दु:ख ही आले

गांगरले गोंधळले पण मीच सावरले

बाऊ न केला कधी त्याचा मुक सोसले…

.मी जीवनास नेहमीच…

 

सुखी आहे कोण इथे सांगा ना जरा

मज दाखवा ना सुखी माणसाचा सदरा

रामकृष्ण आले गेले नाही सुटले…

. मी जीवनास नेहमीच…

 

जो येईल हो दिवस तोच आपला माना

आनंद शोधतोच तोच खरा आहे शहाणा

पंकात कमळ काटे गुलाबास ही आले

. मी जीवनास नेहमीच…

 

हा पाठशिवणीचा खेळ आहे जिंदगी

काटे नि मळ घेऊनच धावते नदी

मनास विचारा हो “नाम” किती घेतले…

. मी जीवनास नेहमीच…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा