*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”कैलासी शिव भगवान”*
कैलासी बैसले ध्यानस्थ शिव भगवान
महायोगी महादेव दाविती आदर्श जीवनIIधृII
हिमालयी प्रदूषण विरहित वातावरण
महादेव व्याघ्रां सोबत होती ध्यान मग्न
शिवाचे मस्तकी आहे धवल गंगा पवित्रII1II
जटा शिरावर धारी शितल अर्धचंद्र
गळा सर्प डोले विराजे कटी व्याघ्राजीन
समीप उमा समोर गणेश कार्तिक सूतII2II
जळ अग्नी निर्वैर तेथे नांदती एकत्र
सर्प उंदीर हाडवैर खेळती स्वच्छंद
मोराचा आहार सर्प परी निर्भय आश्वस्त II3II
सर्वांच्या ठाई पार्वती मातेचे ममत्व
रूप शक्तीवान नंदी बैसला आज्ञावंत
महेश्वर द्वैत टाकताती विरघळवूनII4II
भस्म शंख त्रिशूळ डमरू करिती रक्षण
साधना परम शांती निर्वैरता करी प्रदान
जपू ओम नमः शिवाय जाऊ शिवासी शरणII5II
©️कवी.श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
