You are currently viewing परुळेबाजार ग्रा.पं.च्या स्वच्छतादूत प्रेमा जाधव व माजी सरपंच प्रदिप प्रभु यांचा प्रजासत्ताकदिनी दिल्लीत सन्मान

परुळेबाजार ग्रा.पं.च्या स्वच्छतादूत प्रेमा जाधव व माजी सरपंच प्रदिप प्रभु यांचा प्रजासत्ताकदिनी दिल्लीत सन्मान

परुळे :

 

केंद्र शासनाच्या पेयचल आणी स्वच्छता विभाग स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्हयातील वेंगुले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीला प्रजासत्ताकदिनी विशेष आमंत्रित म्हणून माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रदिप प्रभु व स्वच्छता दूत श्रीम प्रेमा नारायण जाधव यांचा दिल्ली येथील कार्यक्रमान सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहूणे केंद्रीय जल शक्ती विभागाचे मंत्री मा. राजेंद्रसिंह स शेखावत, राजीव चंद्रशेखर, विश्ववर ताडु यांसह अधिकारी उपस्थित होते. यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या श्रीम प्रेमा जाधव यांचा मंत्री महोदयांनी विशेष सन्मान केला. अक्षरश: मंत्री महोदय यांनी प्रेमा जाधव यांचा वयाच्या मान राखत स्वच्छता विषयक कामाबाबतीत त्यांच्या समोर नतमस्तक झाले. संपूर्ण देशातील स्वच्छाताग्रही मधुन आपल्या बरोबर व्यासपीठावर बसण्याचा मान माजी सरपंच प्रदिप प्रभु व प्रेमा जाधव यांना मिळाला हे विशेष.

ही आमच्या कामाची पोचपावती असल्याचे प्रतिपादन प्रदिप प्रभु व प्रेमा जाधव यांनी केले. प्रदिप प्रभु यांनीही आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतीला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. आजही ते सातत्याने या कामात आपला ठसा उमटवित आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांना हा सन्मान मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा