*अनुपमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यशाचा नवा अध्याय!*
डहाणू :
शब्दांचं सामर्थ्य जेव्हा शिक्षणाच्या दिशेने वाहू लागतं, तेव्हा निर्माण घडतो यशाचा अभूतपूर्व इतिहास. दी डहाणू एज्युकेशन ट्रस्टच्या , के.एल.पोंदा.हायस्कूलचा अशाच इतिहासाचा साक्षीदार होत , महात्मा गांधी, राजभाषा हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेचा शंभर टक्के निकाल साधून दाखवला आहे.
महात्मा गांधी राजभाषा हिंदी, पुणे समिती मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेचे यश , हिंदी विभाग प्रमुख सौ.अनुपमा जाधव यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनात आणि आत्मीय मार्गदर्शनात सामावले आहे. शाळेतील विद्यार्थी, पालक, आणि शिक्षक वर्ग यांनी परीक्षेला सकारात्मक प्रतिसाद दिला.परीक्षेचे संपूर्ण नियोजन, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन अनुपमा जाधव यांनी अत्यंत काटेकोरपणे केले. या कार्यासाठी मुख्याध्यापक श्री सोपान इंगळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
साहित्याशी जोडलेली सामाजिक बांधिलकी अनुपमा जाधव केवळ परीक्षेपुरत्या मर्यादित नसून त्या हिंदी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कार्यातही सक्रिय आहेत. भाषा ही केवळ अभिव्यक्ती नाही,ती संस्कृतीची शिदोरी आहे. अनुपमा जाधव यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे, आनंद व्यक्त केला जात आहे. शाळेतून विद्यार्थ्यांचा हिंदी परीक्षेसाठी वाढता सहभाग, उत्तम निकाल ही त्यांच्या कार्याची बोलकी साक्ष आहे.
महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे द्वारा विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले! महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रतिभा पुरस्कार प्राप्त विद्यार्थी कु.अनशिका बारी(इ.६वी), कु.ईशा प्रजापती (इ.७वी), कु.कृपाली वळवी (इ.८वी), कु.रुकसार खान (इ.९वी) तसेच श्री.सोपान इंगळे सर यांना महात्मा गांधी प्रधानाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर सौ.अनुपमा जाधव यांना महात्मा गांधी राजभाषा हिंदी भूषण शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक मेडल व सन्मान पत्र देण्यात आले. तर पुरस्कार प्राप्त झालेल्यांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, ट्राफी देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.तरुण पोंदा सर, उपाध्यक्ष अजय बाफना सर, मानद सचिव श्री. सुधिर कामत सर, मुख्याध्यापक श्री. सोपान इंगळे सर, उपमुख्याध्यापिका सौ.रसिका घागस मॅडम, श्री.सुनिल मोरे सर,सौ.मनिषा पटेल मॅडम यांनी अभिनंदन केले. विद्यार्थी,पालक, शिक्षक वर्ग यांनी आनंद व्यक्त केला.
