You are currently viewing आसोली ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास पॅनल विजयी, सरपंच पदी बाळा जाधव यांची निवड

आसोली ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास पॅनल विजयी, सरपंच पदी बाळा जाधव यांची निवड

तर सदस्यपदी राकेश धुरी, स्वप्निल गावडे विजयी; अन्य ७ ठिकाणी बिनविरोध निवड…

 

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ले तालुक्यातील आसोली ग्रामपंचायती मध्ये ग्रामविकास पॅनल विजयी झाले आहे. यात सरपंचपदी बाळा जाधव हे विजयी झाले असून त्यांनी मोहन जाधव व रमेश जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. तसेच सदस्य पदासाठी नऊ पैकी दोन ठिकाणी लढती झाल्या होत्या. प्रभाग एक मधून राकेश धुरी, प्रभाग तीन मधून स्वप्निल गावडे यांचा विजय झाला आहे. अन्य ठिकाणी बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत. तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला. यावेळी विश्वनाथ धुरी, उदय धुरी, गुरुनाथ घाडी, सुजाता देसाई, भूषण धुरी, महेश धुरी, मंदार धुरी आदींसह मोठ्या संख्येने विजयी उमेदवारांचे समर्थक उपस्थित होते. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग १ मधून तुकाराम कोंबे, शितल घाडी प्रभाग २ मधून प्राजक्ता जाधव, राखी धुरी, संकेत धुरी, तर प्रभाग ३ मधून रति नाईक व नेत्रा राणे आदींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा