You are currently viewing नांदगाव तिठा उड्डाणपुलावर दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे जखमी

नांदगाव तिठा उड्डाणपुलावर दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे जखमी

नांदगाव तिठा उड्डाणपुलावर दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे जखमी

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा येथील उड्डाणपुलावर दोन दुचाकी समोरासमोर धडकून अपघात झाला. दुपारी ३.५० सुमारास ही घटना घडली. या घटनेत दुचाकीवरील दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोन्ही जखमींना तातडीने तेथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दाखल करण्यात आले. तर अधिक उपचारासाठी दोन्ही जखमींना कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघातात श्रेयस रवींद्र कागवाड (वय २३, रा.कासार्डे), साहील प्रेमनाथ दळवी (वय २०, पियाळी फोंडा) हे दोघे जखमी झाले आहेत. यातील एक दुचाकीस्वार महामार्गाच्या विरूद्ध बाजूने जात होता. त्‍यामुळे एका लेनवर आलेले दोन्ही दुचाकीस्वार एकमेकांना धडकल्‍याची माहिती स्थानिकांतून देण्यात आली. या अपघातात एमएच १२ पीडी ६३०७ आणि एमएच ०७ वाय ०८२६ या दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा