You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात हस्ताक्षर स्पर्धा

सावंतवाडी तालुक्यात हस्ताक्षर स्पर्धा

सावंतवाडी तालुक्यात हस्ताक्षर स्पर्धा

शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा

सावंतवाडी:

जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त, श्री सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ, नेमळे यांनी सावंतवाडी तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये पार पडणार आहे.

लहान गटामध्ये (पाचवी ते सातवी) असलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे स्वहस्ताक्षरात लेखन करणे आवश्यक आहे, तर मोठ्या गटामध्ये (आठवी ते दहावी) विद्यार्थ्यांनी ‘प्रतिज्ञा’चे स्वहस्ताक्षर करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशिका मुख्याध्यापकांच्या सहीसह श्री सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ, नेमळे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे दि. 26 जानेवारीपर्यंत पाठवावी किंवा थेट पोहोचवावी.

स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना 500 रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला 400 रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तसेच तृतीय क्रमांकाला 300 रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

आयोजकांनी सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल आरती गावडे (मोबाईल: 7875024424) यांच्याशी संपर्क साधता येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा