*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कुत्रा सुध्दा कां उगा रडे?*
घेऊन हाती प्रभाकराला
साद घालते गावकर्यांस
घेऊन हाती काठी लाठी
बंद कराया बिबळ्यास……..
चुचकारून त्या संघशक्तीला
रोखू पहाते बिबट्याला
अंगी संचारे राणी झाशीची
सलाम करुया या नारीला…..
खेड्यावरचे पाणी अलग
वासावरून कळतो बिबट्या
उडता गोंधळ खुराड्यात
नाही वाजवत कोणी शिट्ट्या..
झोपलेल्यांना करून जागे
म्हातारी धावते *पुढे पुढे*
भय भिती ना तिला कशाची
तंगडी ना ती कोणाची ओढे…
रोजचेच होता रडणार कोण
चित्र पहातो *सगळीकडे*
आजकाल झाल सवयीच
कुत्रासुध्दा कां *उगाच रडे?*…
विनायक जोशी🖋️ ठाणे
मीलनध्वनी/9324324157
