You are currently viewing गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची सावंतवाडी राजवाड्यास सदिच्छा भेट

गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची सावंतवाडी राजवाड्यास सदिच्छा भेट

सावंतवाडी संस्थानच्या राजपरिवाराकडून पारंपरिक स्वागत; वारसा व संस्कृतीवर सकारात्मक चर्चा

सावंतवाडी :

खाजगी दौऱ्यानिमित्त गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी सावंतवाडी येथील सावंतवाडी राजवाडा येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीप्रसंगी सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेम सावंत भोसले, राणीसाहेब शुभदा देवी भोसले तसेच युवराज लखमराजे भोसले यांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

या वेळी राज्यपालांना सावंतवाडी राजवाड्याचा ऐतिहासिक वारसा, कला व संस्कृतीची सविस्तर माहिती देण्यात आली. राजवाड्यातील कलाकुसर, प्रसिद्ध लाकडी खेळणी तसेच सावंतवाडी संस्थानच्या परंपरेविषयी त्यांनी विशेष रस व्यक्त केला.

या भेटीदरम्यान सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाच्या जतन व संवर्धनाबाबत सकारात्मक चर्चा झाली. सावंतवाडीच्या समृद्ध परंपरेचे जतन पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा