वेंगुर्ले नगरपरिषदेत उपनगराध्यक्षपदी सुहास गवंडळकर बिनविरोध
स्वीकृत नगरसेवकपदी प्रशांत आपटे व दाजी परब*
वेंगुर्ले :
वेंगुर्ले नगरपरिषदे च्या आज झालेल्या खास सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे विनायक उर्फ सुहास सदानंद गवंडळकर यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे श्री. गवंडळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी नगरसेवक प्रशांत आपटे आणि भाजप नेते नारायण राणे यांचे खंदे समर्थक यशवंत उर्फ दाजी परब यांची निवड करण्यात आली आहे.
वेंगुर्ले नगरपरिषद च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सभा नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रथम मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे प्रशासनाच्या वतीने अभिनंदन व स्वागत केले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या सह नगरसेवक सुहास गवंडळकर, रवी शिरसाट, प्रितम सावंत, प्रणव वायंगणकर, सुधीर पालयेकर, युवराज जाधव, सचिन शेट्ये, सदानंद गिरप, विनय नेरुरकर, संदेश निकम, ॲड. सुषमा खानोलकर, गौरी माईंणकर, रिया केरकर, गौरी मराठे, शितल आंगचेकर, काजल कुबल, आकांक्षा परब, सुमन निकम, लीना म्हापणकर, समिधा रेडकर तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सभेमध्ये प्रथम उपनगराध्यक्ष पदासाठी निवडप्रक्रिया घेण्यात आली. त्यात सुहास गवंडळकर यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे ही निवड बिनविरोध पार पडली. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदाचा विषय आला. त्यावेळी प्रशांत आपटे आणि दाजी परब यांच्या नावाची बिनविरोध घोषणा करण्यात आली. या तिन्ही निवडी नंतर जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी उपनगराध्यक्ष आणि दोन्ही स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पपू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, वसंत तांडेल, मनवेल फर्नांडिस, साईप्रसाद नाईक, वृंदा गवंडळकर, दादा केळुस्कर, सायमन आल्मेडा यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

