दोडामार्ग तालुक्यात विकासकामांचा झपाट्याने शुभारंभ;
पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या सहकार्याने रस्ते व सार्वजनिक विहिरींची भूमिपूजने – तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमी कटीबद्ध असतो त्यामुळे तालुक्यात अनेक विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यासाठी पालकमंत्री नितेश राणेसाहेब, आमदार दिपक केसरकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळच्या सत्रात आमदार निधीतून मंजूर सासोली हेदूसवाडी येथे सार्वजनिक विहीर, सासोली हेदूस गोवा रस्ता तर मणेरी तेलीवाडी ते राष्ट्रोळी मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, मणेरी तळेवाडी आंबेली रस्ता अशा विहीर व रस्ता भूमिपूजन ने करण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यात अनेक गावात विकास कामांची भूमिपूजन करण्यासाठी भरघोस निधी मिळाला आहे. आमदार दीपक भाई केसरकर यांनी नेहमीच दोडामार्ग तालुक्याला झुकते माप दिले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांची सुद्धा चांगली साथ मिळाली आहे असे गवस यांनी सांगितले
यावेळी गणेश प्रसाद गवस यांच्यासह उपतालुका प्रमुख बाबाजी देसाई, सज्जन धाऊसकर, लक्ष्मीकांत करमळकर, अरुण नाईक, दीपक गवस, आनंद धाऊसकर, निशांत तळवणेकर सरपंच सिद्धी कांबळे, विशाल परब, शेखर भुजबळ, फटजी नाईक, सुनील मांजरेकर , सुनिता नाईक, लक्ष्मी तळवडेकर, स्वरूपा मांजरेकर, गीता राणे, पल्लवी तळवडेकर उपस्थित होत्या.
