You are currently viewing देव वेतोबा देवस्थानतर्फे शिरीषकुमार बालवाचनालयाला पुस्तक संचाची भेट
Oplus_16908288

देव वेतोबा देवस्थानतर्फे शिरीषकुमार बालवाचनालयाला पुस्तक संचाची भेट

विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासावी, जयवंत राय यांचे आवाहन

वेंगुर्ला / आरवली :

पुस्तके ही ज्ञानार्जनाचे काम करतात. पुस्तकी ज्ञानाने मुलांची शैक्षणिक प्रगती होते. पुस्तके हे ज्ञान वाढविणारे पायाभूत अंग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त पुस्तकांचे वाचन करून ज्ञान वाढवावे. या ज्ञानातून आपण मोठे होत जातो. यासाठी शाळेतील मुलांनी या बाल वाचनालयातील पुस्तकांचे नियमित वाचन करावे, असे प्रतिपादन श्री देव वेतोबा देवस्थान, आरवलीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी केले.

श्री देव वेतोबा देवस्थान न्यास आणि भक्त परिवार यांच्या वतीने जीवन शिक्षण शाळा आरवली नं. १ येथील शिरीषकुमार बालवाचनालयाला पुस्तक संचाची भेट देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, विश्वस्त डॉ. प्रसाद साळगावकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गजानन मेस्त्री, पालक-शिक्षक संघाच्या सौ. दळवी, सौ. कर्णेकर व सौ. रगजी उपस्थित होते. यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ. प्रसाद साळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका श्रीमती कोकितकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक शिक्षिका सातपुते यांनी केले, तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार शिक्षिका म्हाडगुत यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा