You are currently viewing धर्मेंद्र यांच्यावरील चित्रपटगीतांच्या मैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध

धर्मेंद्र यांच्यावरील चित्रपटगीतांच्या मैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध

*धर्मेंद्र यांच्यावरील चित्रपटगीतांच्या मैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध*

पिंपरी

विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘गाडी बुला रही है…’ या मर्दानी सौंदर्याचा देखणा नायक धर्मेंद्र यांच्यावरील हिंदी चित्रपटगीतांच्या सुमधुर, नि:शुल्क दृकश्राव्य मैफलीने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. गदिमा प्रेक्षागृह, निगडी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित या खास सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या मैफलीस दिशा सोशल फाउंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष व वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, उपाध्यक्ष संतोष बाबर, साहित्यिक अशोक कोठारी, उज्ज्वला केळकर, विलास गादडे, ॲड. स्मिता शेटे, उषा शेटे, साहिल कांबळे, शुभम इगवे, उत्तम जाधव, विश्वांत काळोखे, आबा काळोखे, मोहन भस्मे, शैलेंद्र ढमढेरे, डॉ. किशोर वराडे, राजेंद्र लढ्ढा, सुधाकर पाढळकर, नयना ढमढेरे, स्मिता विजयन, विजीश विजयन, श्यामकुमार पांडे, योगेश म्हस्के यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रख्यात गायक ललिता जगदाळे, अमृता कुलकर्णी, तुषार पिंगळे, विजय वाघमारे हे अतिथी गायक म्हणून लाभले. तसेच सतीश कापडी, अरुण सरमाने, राजेंद्र पगारे, सूर्यकांत ताम्हाणे, सीमा पोडाला, सचिन शेटे, नंदकुमार कांबळे, विनायक कदम या गायक कलाकारांनी हिंदी चित्रपटातील वैविध्यपूर्ण गीतांचे प्रभावी सादरीकरण करून रसिकांना खिळवून ठेवले.

प्रत्येक गीताच्या सादरीकरणासोबत त्या गीताच्या निर्मितीची माहिती व संबंधित चित्रपटातील दृश्ये पडद्यावर दाखवण्यात आल्याने रसिकांसह सिनेप्रेमींना स्मरणरंजनाचा निखळ आनंद अनुभवता आला.

“पल पल दिल के पास” , “तुम जो चले गये तो” या धर्मेंद्र गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली; तसेच “चल मेरे भाई”, “शीशा हो या दिल हो”, “इतना तो याद है मुझे”, “जानू मेरी जान” या गीतांना प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्या आणि “वन्स मोअर”ची मागणी झाली. त्यानंतर दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर चित्रित असलेले शीर्षकगीत ‘गाडी बुला रही है…’ सादर करण्यात आले. तुषार पिंगळे यांनी किशोरकुमार यांच्या आवाजाशी साधर्म्य साधत केलेले सादरीकरण श्रोत्यांना विशेष भावले.

“हम बेवफा हरगिझ न थे” या गीताच्या सादरीकरणापूर्वी प्रेक्षागृहातील सर्व उपस्थितांनी उभे राहून दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमाचे संयोजन विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी केले. सचिन शेटे यांनी विशेष सहकार्य केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन केले. सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रणाची जबाबदारी सांभाळली. विक्रम क्रिएशन यांनी तांत्रिक साहाय्य दिले; तर छायाचित्रण नागेश झलकी यांनी केले. निराली मांकड यांनी हलक्या – फुलक्या शैलीत प्रभावीपणे मैफलीचे निवेदन केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा