You are currently viewing जिल्ह्यातील रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी ‘नागरिक आरोग्य हक्क समिती’चा पुढाकार

जिल्ह्यातील रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी ‘नागरिक आरोग्य हक्क समिती’चा पुढाकार

जिल्ह्यातील रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी ‘नागरिक आरोग्य हक्क समिती’चा पुढाकार

सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील सर्व रुग्णांना सर्वोत्तम आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सर्व आरोग्यविषयक योजनांचा लाभ प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत पोहोचावा, यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सावंत यांनी व्यक्त केले आहे.
या उद्देशाने “नागरिक आरोग्य हक्क समिती – जिल्हा सिंधुदुर्ग” या व्यासपीठाच्या माध्यमातून सरकारी आरोग्य योजनांचा प्रभावी पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आवश्यक असल्यास, जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याचीही तयारी ठेवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना समान, वेळेवर व योग्य उपचार मिळावेत, कोणताही रुग्ण आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, हा या समितीचा मुख्य उद्देश असल्याचे सावंत यांनी सांगितले. आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून, तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाला जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते व जागरूक नागरिकांनी सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा