पुरोगामी विचारांचे , उगवत्या सूर्याचे उसळते तेज गगनात पसरलेले ७५ वर्षाचे दैनिक हिंदुस्थान! सामाजिक बांधिलकी जपणारा, सर्व राजकीय पक्षाना समानतेने पाहणारा! निरपेक्ष वृत्तीचा दै हिंदुस्थान ! आमची शान! दै हिंदुस्थान बद्दल प्रत्येकाच्या मनात इतकी आत्मीयता प्रेमभाव विनाकारण नाही! जिल्ह्यात सर्वाधिक खप असलेले हे वर्तमानपत्र! त्यासाठी रक्ताचे पाणी करून स्वातंत्र्य सैनिक कै. बाळासाहेब मराठेंनी सुरु केलेले, व कै अरुण मराठेनी तितक्याच आत्मीयतेने यशोशिखरावर नेलेले हे दै हिंदुस्थान वाचकांच्या, लिहिणाऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. इथे लिहित्या हातांना प्रोत्साहन मिळते! हिंदुस्थान आमच्या हक्काचा, आमचा, अशी प्रेमभावना, विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण होण्यासाठी मराठे परिवार जी मेहनत घेत आहेत त्याला कुठेच तोड नाही निस्पृहतेने सगळे आपली जवाबदारी योग्यप्रकारे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात ! छपाई विभाग सुद्धा आपले काम सतत करीत असतात! कंटाळा, जमणार नाही असे शब्द कुणाच्या शब्दकोशात नाहीतच!सावधतेने करीत असलेल्या कामामुळेच हे दैनिक वाचकांना मागील ७५ वर्षांपासून सतत सेवा देत आहे माझ्या माहितीप्रमाणे इतके वर्ष टिकणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच दैनिक असावे ! मराठे मंडळींना स्वतःचा बडेजावही आवडत नाही आपण ह्याची प्रचितीही वेळीवेळी घेतली आहे म्हणूनच मातोश्री कै प्रभाताईंच्या नावाने दिल्या जाणाऱ्या प्रभास पुरस्काराच्या वेळी मराठे कुटूंबातील एकही सदस्य व्यासपीठावर नसतो! ईश्वर दरबारी प्रत्येक भल्याबुऱ्या कामाची नोंद घेतलीच जाते हे निर्विवाद सत्य आहे त्याची प्रचिती आज अनुभवायला मिळाली.
कै व्यंकटेश ब्रम्हदेव जहागिरदार हे १९१८ ते १९५३ या काळातले तत्वनिष्ठ शिक्षक होते तें एम ए ही पदवी असलेले त्या काळातील अपवादात्मक शिक्षक! इंग्रजी व इतिहास या विषयावर प्रभूत्व असलेले सर विद्यार्थ्यां ना खुप आवडत असतं तसेच आपल्या कर्तृत्वाने ते लोकप्रिय देखील होते. मागच्या वर्षी त्यांच्या कुटूंबियांनी त्यांचा १२५ वा वाढदिवस साजरा केला, ह्यावरून इतकी वर्षे सातत्याने त्यांची आठवण ठेवणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांचे ही कौतुक केले पाहिजे. सर्वजण एकत्र असतांना त्यांनी विचार केला की, कौटूंबिक पातळीवर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तीचा किंवा एखाद्या संस्थेच्या सेवेचा गौरव केला तर? विचारचक्र सुरू झाले ,आणि सर्वप्रथम त्यांच्या नजरेत भरले दै हिंदुस्थान!
काल सोमवार दि २९ डिसेंबरला हा स्मृतिसेवा गौरव पुरस्कार सन्मा जहागिरदार कुटूंबाच्या वतीने त्यांच्या गुलमोहर कॉलनी कँप, अमरावती येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ के. एस. कुलकर्णी( माजी संचालक उच्च शिक्षण) होते त्यांच्याच हस्ते ह्या पुरस्काराचा स्वीकार सलग २४ वेळ अखिल भारतीय वृत्तपत्र मालक संघटनेच्या सदस्यपदी अविरोध निवडून आलेले, दै हिंदुस्थानचे प्रबंध संपादक आपल्या सगळ्यांच्या गळ्यातले ताईत, आपले लाडके श्री विलास अरुण मराठेंनी ,, जहागिरदार कुटूंब, मराठे कुटूंब व मराठे परिवाराचा एक अभिन्न सदस्य असलेल्या अमरावतीचे प्रख्यात डॉक्टर श्री सुरेश सावदेकर ह्यांच्या उपस्थितीत अतिशय नम्रतेने टाळ्यांच्या कडकडाटात स्वीकारला. त्यावेळचे कै व्यंकटेश जहागिरदार व कै बाळासाहेब मराठे , कै अरुण मराठे ह्यांनी देखील स्वर्गातून नक्कीच पुष्पवृष्टी केली असणार ह्यात शंका नाही! जहागिरदारांनी पुरस्कारासाठी केलेल्या निवडीने मराठे मंडळी करीत असलेल्या श्रमाचे सार्थक झाले म्हणून त्यांचे खूप खूप अभिनंदन व जहागिरदार कुटूंबाने योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल त्यांचेंही मनापासून अभिनंदन !
परमेश्वराला एकच प्रार्थना एकच मागणे आहे
दश दिशात पसरो सुगंध या सुमनांचा
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
