You are currently viewing वाळू, चिरेखाण व वेळागर प्रश्नी जनतेच्या शंकांचे निरसन

वाळू, चिरेखाण व वेळागर प्रश्नी जनतेच्या शंकांचे निरसन

वाळू, चिरेखाण व वेळागर प्रश्नी जनतेच्या शंकांचे निरसन

*सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा;माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास

ओरोस;
जनतेच्या मनातील शंका कुशंका ज्या होत्या, त्या दूर केल्या. वाळू व्यवसायिकांचा जो प्रश्न होता त्यावर धोरण निश्चित होत नव्हते. त्यांना होणारा त्रास आणि विविध पद्धतीने होणाऱ्या चुकीच्या कारवाया या सर्व बाबतीत कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार त्या – त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यानी सुध्दा समस्या जाणून घेतली. व्यवसाय करणारे आमच्या जिल्ह्याचे, आमचे भूमिपुत्र आहेत. त्यांचा व्यवसाय सुरळीत करण्यात यावा, यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. आमदार निलेश राणे त्याबाबतीत आग्रही आहेत. त्यामुळे सर्व दृष्टिकोनातून मार्ग काढले जात आहेत अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्ह्यातील वाळू प्रश्न, चिरेखान व्यावसायिकांचे प्रश्न, वेळागर येथे फाईव्ह स्टार ताज हॉटेल प्रकल्प होणार आहे त्या ठिकाणच्या लोकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी बैठका पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतल्या आणि त्या ठिकाणी जनतेचे समाधान करून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमीसे, आधी उपस्थित होते.
शिरोडा वेळागर या ठिकाणी ताज च्या माध्यमातून फाईव्ह स्टार हॉटेल्स उभे करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या शंका स्थानिक रहिवाशांना होत्या त्या शंकांचे निरसन करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी आमदार दीपक केसरकर,माजी आमदार राजन तेली, जयप्रकाश चमनकर अशी जाणकार मंडळी उपस्थित होती. या बैठकीत जनतेच्या ज्या शंका होत्या त्यांचे निराकरण करण्यात आलेले आहे. भविष्यातही जनतेला विश्वासात घेऊन, जनतेचे हित जोपासून विकास केला जाईल असा विश्वास यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. प्रत्येकाचे शंका समाधान करायचे आणि विकासासाठी काम करायचे हा आपला मानस असल्याचे त्यांच्या एकूणच संवादातून दिसून आले.
चिरे व्यावसायिक यांच्या देखील काही समस्या होत्या. त्यावर चर्चा करण्यात आली. त्यातून योग्य तो मार्ग काढण्यात आले.दत्ता सामंत यांनी शेती संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या बंदुका आहेत. त्यात काही नियम शिथिल झाले पाहिजे. अशी मागणी केलेले आहे. त्या दृष्टिकोनातून मुद्दे मांडले आहेत.जिल्ह्याच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून विविध विषय लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या समोर येत असतात. विविध शिष्टमंडळ देखील येत असतात. त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आज बैठक आयोजित करण्यात आली होती.
मुंबई महानगरपालिका असो किंवा इतर २८ महापालिका असो या सर्वांवर महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे. असेच आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सत्ताधारी म्हणून निश्चय केलेला आहे. आम्ही त्या प्रमाणे आमची रणनीती देखील ठरवलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा