You are currently viewing अमरावतीच्या निरोग संस्थेतर्फे राज्यस्तरीय आरोग्य शिबीर उत्तर प्रदेशमधील तज्ञ येणार 

अमरावतीच्या निरोग संस्थेतर्फे राज्यस्तरीय आरोग्य शिबीर उत्तर प्रदेशमधील तज्ञ येणार 

 

आधुनिक काळात माणूस वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलेला आहे. ज्याला रोग नाही असा माणूस सापडणे कठीण. मधुमेह उच्च दाब वजन इत्यादी आजार हे सर्वसामान्य झाले आहेत. पण या सर्व आजारांवर मात कशी करावी व कोणत्याही प्रकारचे औषध न घेता आपली प्रकृती ठणठणीत कशी करावी यासाठी अमरावतीच्या तू प्रसिद्ध अशा निरोग संस्थेने माहेश्वरी पंचायत च्या सहकार्याने अमरावतीला राज्यस्तरीय आरोग्य विकास शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर प्रदेशमधून तज्ञ वैद्यकीय मार्गदर्शक येणार असून ते आपली सेवा संपूर्ण भारतात विनामूल्य देत असतात. यावेळेस या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील तप सेवा सुमीरनचे पुरस्कर्ते डॉ. गोपाल शास्त्री हे येणार आहेत. 2 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीमध्ये अमरावतीच्या सराफा परिसरातील धनराज लाईन येथे असलेल्या माहेश्वरी भवनमध्ये हे शिबीर संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये भाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी अधिक माहितीसाठी माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्री राधेश्याम भुतडा यांच्याशी 9765443643 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन या शिबिराचे प्रसिद्धीप्रमुख व निरोग संस्थेचे पदाधिकारी प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

 

या सात दिवसाच्या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आजारावर कसा विजय मिळवायचा याचा रामबाण उपाय सांगण्यात येणार आहे. त्यामध्ये आदर्श भोजन पद्धती उपवास वमन एनिमा ध्यान सूक्ष्म व्यायाम याविषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार असून आपल्या आहारामध्ये पानांचा रस भाज्यांचा रस सलाड फळ अल्पोपहार हरबल काढा व संतुलित आहार कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निरोग संस्था गेल्या 30 वर्षापासून अशा प्रकारचे शिबिरे नियमितपणे आयोजित करून करीत आहे. या शिबिराचा फायदा आतापर्यंत हजारो लोकांना झाला असून त्यांनी त्याबद्दल निरोग संस्थेचे आभारीही मानले आहेत.

 

महाराष्ट्रातील जे लोक विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त आहेत त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन निरोग संस्थेतर्फे श्री सुरेश करवा श्री अरुण टाक श्री नंदकिशोर राठी श्री नंदकिशोर चांडक व सचिव प्रा. जगदीश कलंत्री यांनी केले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी दोन जानेवारीला सकाळी आठ वाजता माहेश्वरी भवन धनराज लेन सराफा जवळ अमरावती येथे उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही निरोग संस्थेच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे. हे शिबिर केल्यानंतर कोणताही माणूस आजारी पडत नाही .कारण या शिबिरामध्ये आजारी पडू नये व आजारी पडलेला माणूस औषध न देता कसा चांगला होऊ शकतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात येते. दरवर्षी या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून साधारणपणे 300 शिबिरार्थी सहभागी होतात. या शिबिरात बाहेर गावावरून येणाऱ्या शिबिरार्थींची अतिशय अल्प दरात अमरावतीच्या माहेश्वरी भवनमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन निरोग संस्था व माहेश्वरी पंचायत यांनी केली आहे.

 

प्रकाशनार्थ

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

प्रसिद्धी सचिव व कार्यकारिणी सदस्य

निरोग संस्था अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा