You are currently viewing सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नाताळ सण साजरा

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नाताळ सण साजरा

*सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नाताळ सण साजरा*

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला या शाळेमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा डिसोझा यांचे स्वागत शाळेच्या शिक्षिका सिद्धी हरमलकर यांनी केले.
यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. नाताळनिमित्त विद्यार्थ्यांनी नृत्य,गीत व मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच नाताळाच्या संदेशावर आधारित एक सुंदर नाट्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून सांताक्लॉजचा उत्साहवर्धक नृत्याविष्कार सादर करण्यात आला. सांताक्लॉजच्या आगमनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी मुख्याध्यापिका मनीषा डिसोझा यांनी विद्यार्थ्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना सुंदर गिफ्ट वस्तू देण्यात आल्या व खाऊचे वाटपही करण्यात आले.
हा नाताळ सण विद्यार्थ्यांनी आनंद, उत्साह व एकोप्याने साजरा केला. नाताळनिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,संचालक प्रशांत नेरूरकर आणि सेक्रेटरी आनंद परुळेकर यांनी देखील विद्यार्थ्यांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी श्रेया मराठे आणि संदीप यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेची विद्यार्थिनी मानसी रावल हिने केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा