एक तळमळीची सामाजिक कार्यकर्ती समीरा खलील निवडणूक हारली पण त्यांची सामाजिक बांधिलकी मात्र येथे जिंकली.
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीमध्ये एकही रुपया खर्च न करता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची सचिव समीरा खलील नगरपरिषद निवडणुकीला सामोरी गेली एका बाजूला निवडणूक तर दुसऱ्या बाजूला 8 दिवसांवर येऊन ठेपलेल तिच्या मुलीच लग्न तर त्याच कालामध्ये घरामध्ये एक दुर्दैवी दुःखद घटना या सर्व संकटांना न डगमगता ती निर्भडपणे उभी राहिली.
खरंच अहो रात्र लोकांसाठी आपली सामाजिक बांधिलकी पणाला लावणारी समीरा खलील हिला वॉर्ड क्रमांक 4 झिरंग येथील निस्वार्थपणे नागरिकांनी 466 इतकं भरभरून मतदान दिल. पण दुर्दैव केवळ 18 मतांनी तिला पराभवाला सामोर जावं लागलं परंतू तीने नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानून हसत हसत पराभवाला सामोरी गेली आणि इथेच ती खऱ्या अर्थाने जिंकली अशा या सच्चा सामाजिक कार्यकर्तीला नागरिकांनी पुष्पहार घालून तिचं भव्य स्वागत केलं ही एक दुर्मिळ गोष्ट नसून तिच्या कर्तुत्वाची सिद्ध झालेली ओळख आहे.समीरा खलील तुमच्या सामाजिक बांधिलकीला माझा सलाम.
