You are currently viewing सावंतवाडीत नवनिर्वाचित नगरसेवकांचा गौरव; दीपक केसरकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सावंतवाडीत नवनिर्वाचित नगरसेवकांचा गौरव; दीपक केसरकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

नगरविकासासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन

सावंतवाडी :

शहराच्या विकासासाठी नव्या दमाने कामाला लागलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सन्मान करून त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

श्रीधर अपार्टमेंट येथे आयोजित या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी नगराध्यक्ष संजू परब, शहरप्रमुख तथा नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे तसेच नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक व शर्वरी धारगळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी दीपक केसरकर यांनी सर्व नगरसेवकांनी नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करावा, असे आवाहन करत सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

या सत्कार समारंभास दत्ता सावंत, संजय पेडणेकर, दिपाली सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा