You are currently viewing गुगलकडून (Google) हैराण करणारी माहिती आली समोर

गुगलकडून (Google) हैराण करणारी माहिती आली समोर

कोरोना काळात अनेक जण घरातच आहेत. भारत अशा देशांमध्ये येतो, जिथे इंटरनेट स्वस्त आहे. अशात लोक घरी बसून सर्वात जास्त काय सर्च करत आहेत याबाबत गुगलकडून (Google) हैराण करणारी माहिती समोर आली आहे. गुगल ट्रेंडमध्ये (Google Trend) मागील पाच वर्षातील अभ्यास केल्यानंतर पहिल्यांदा भारतीयांमध्ये ट्रेडिंग अर्थात शेअर बाजार सर्वाधिक ट्रेंड करत होता.

गुगल ट्रेंडमध्ये मागील पाच वर्षांतील डेटाचा अभ्यास केल्यानंतर 2020 च्या नोव्हेंबर महिन्याचा डेटा आणि या वर्षातील फेब्रुवारी आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील डेटाद्वारे ही माहिती समोर आली आहे. म्हणजेच या महिन्यांत गुगल ट्रेंडचा आलेख स्पष्टपणे दर्शवतो, की भारतीयांचा शेअर बाजाराकडे कल प्रचंड वाढला आहे.

शेअर बाजार ट्रेडिंग सर्च करण्यात महाराष्ट सर्वात पुढे –

शेअर बाजारासंबंधी माहिती सर्च करण्यात भारतात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर दक्षिण भारतातील राज्य शेअर मार्केटबाबत सर्वाधिक सर्च करतात.

महाराष्ट्रात शेअर बाजार सर्च इंटरेस्ट रेट 100 टक्के, तर गुजरातमध्ये 78 टक्के आहे. कर्नाटक, केरळ, तमिळनाडूमध्ये सर्च इंटरेस्ट रेट 94, 95, 85 असा आहे. मागील वर्षात स्टॉक ट्रेडिंगमध्ये लोकांची आवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 8 ते 14 नोव्हेंबरमध्ये यात अचानक अतिशय मोठी वाढ झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 5 =