*अमरावतीच्या दैनिक हिंदुस्थानला कै. व्यंकटेश ब्रम्हदेव जहागिरदार स्मृती सेवा गौरव पुरस्कार*
अमरावती :
ही दै. हिंदुस्थानवर अहेतुक प्रेम करणाऱ्या समस्त प्रेमी जनांना आनंद देणारी बातमी वाचली. आणि आनंदाचे डोही आनंद तरंग अशी मनाची अवस्था झाली.
75 वर्षांपुर्वी पुरोगामी राष्ट्रीय विचारांचे दैनिक म्हणून सुरू झालेले, हे वृत्तपत्र, शरदचंद्र सिन्हाच्या कुशल कुंचल्याने साकार झालेला मुखपृष्ठावर अगदी मध्यभागी असलेला उगवता सूर्य ही दै हिदुस्थानची कवच कुंडले लेवून सातत्याने सेवा देत आहे. सलग 23 वेळा देशातील सर्वोच्च अखिल भारतीय वृत्तपत्र मालक संघटनेच्या संचालक पदावर अविरोध निवडून येणारे श्री प्रबंध संपादक श्री विलास मराठे; सातत्याने निर्भीडतेने अग्रलेख लिहिणारे मुख्य संपादक श्री उल्हास मराठें च्या नेतृत्वाखाली दै हिंदुस्थानची वाटचाल सुरू आहे. स्वातंत्र्य सैनिक कै बाळासाहेब मराठेनी सुरू केलेले हे वृत्तपत्र. त्यांचे सुपुत्र कै अरुण मराठेंनी तितक्याच जोमाने आलेल्या अडचणींना सामोरे जात पुढे चालू ठेवले . अनेक समस्या आल्यात, आगीचे तांडव पाहायला मिळाले. परंतु फिनिक्स पक्ष्यांप्रमाणे अधिक जोमाने वृत्तपत्र चालू ठेवण्यासाठी मदत करायला अनेक हात समोर आले! और कारवा चलता रहा। हे वृत्तपत्र अमरावतीचा प्राण ,मानबिंदू ! कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबाबा खाली नसलेले! सगळ्यांना लिहिण्याचे ,आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य ! त्यामुळे रोजच दै हिंदुस्थान वाचनीय अग्रलेख, व्यक्तिविशेष, कथा कविता स्फुट लेखन अशा अनेक शब्दसुमनांनी बहरलेला असतो बौद्धिक भूक वाढविणारे शब्दकोडे , ताज्या घडामोडी व जाहिराती असतातच! ह्याशिवाय सामाजिक बांधीलकीचे प्रतक्ष दर्शन घडविणारा, मागील तीन वर्षांपासून कै अरुण मराठेच्या स्मृतीदिनी दिल्या जाणारा प्रभास पुरस्कार ! संपूर्ण मराठे परिवार योग्य दिशेने प्रगती होण्यासाठी , धडपडत असतांना चौथ्या पिढीतील तरुण रक्त सर्वेश मराठेंच्या रूपाने मिळालेले वरदानच!
तू चाल पुढे तुला रे गड्या भीती कुणाची अशी सगळ्यांचीच भावना! मागील काही दिवसांपासून निर्भीड पत्रकारितेचे दर्शन घडविणारे प्रबंध संपादक, श्री विलास मराठेंचे अमरावतीच्या अनेक समस्यावरचे जळजळीत लेख वाचून शासनाला जाग यावी!
ह्या वृत्तपत्राची सर्व पक्ष आमच्यासाठी सारखेच अशी परखड भावना आहे नाठाळाचे पाठी देऊ काठी अशा वृत्तीमुळे सर्वाधिक खप असलेले हे वृत्तपत्र आम्हा अमरावतीकरांचा मानबिंदू !
आजची बातमी वाचून झालेला आनंद व्यक्त करण्याचा हा अल्पसा प्रयत्न!
जहागिरदार परिवाराने दै. हिंदुस्थानच्या निरपेक्ष कार्याची दखल घेऊन कै व्यकटेश ब्रम्हदेव जहागिरदार स्मृती सेवा गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला! हा कौटुबिंक कार्यक्रम २९ डिसेंबर ला होणार आहे सन्मानपत्र व ५१००० रुपये रोख असे ह्या पुरस्काराचे स्वरूप असेल ह्यासाठी दै हिंदुस्थानचे, अविरत मेहनत घेणाऱ्या सर्व मराठे परिवाराचे सहर्ष अभिनंदन ! पुरस्कारासाठी योग्य निवड करणाऱ्या जहागिरदार कुटूंबाचेही अभिनंदन !
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
